Pune News | पुण्याचे 7 खासदार केंद्रात, पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पॉवर’ वाढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election 2024) भाजपाला (BJP Mahayuti) अपेक्षित यश मिळाले नसले तरी एनडीए ने दिल्लीत सरकार (NDA Govt) स्थापन केले आहे. त्यामुळे राज्यातील काही नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. पुण्याचे एकूण सात खासदार दिल्लीत आहेत. सर्वानी मतभेद विसरून ताकद लावली तर पुण्याचा कायापालट होईल अशी मांडणी केली जात आहे.

पुण्यातून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळांना (Murlidhar Mohol) मंत्रिपद मिळालेले आहे. सहकार आणि नागरी विमान वाहतूक खाते त्यांच्याकडे आहे. अन्य सहा खासदारांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हे जेष्ठ आणि राजकारणात अनुभवी असलेले नेतृत्व आहे.(Pune News)

जिल्ह्यातून निवडून आलेल्या खासदारांमध्ये प्रथमच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री झालेले आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule), श्रीरंग बारणे (Shrirang Barne), डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) या तिघांनाही लोकसभेचा दांडगा अनुभव आहे.

सुळे व कोल्हे एकाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आहेत; तर बारणे राज्यात मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे (Eknath Shinde Shivsena) आहेत. पक्ष वेगवेगळे असले तरी ७ जण जिल्ह्याच्या प्रश्नांवर एकत्रित राहून बरेच काही करू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

राज्यसभेवर निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या पुण्याच्या कोथरूडमधील आहेत. त्या आमदार होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यासुद्धा यंदा राज्यसभा खासदार झालेल्या आहेत.

त्यामुळे मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमआयडीसी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते , नदीसुधार आणि अन्य अशा केंद्राशी
संबंधित विषयावर आवाज उठवून काम केल्यास पुण्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
जिल्ह्यात प्रथमच आलेल्या राजकीय पॉवरचा सुयोग्य उपयोग करण्यावर नेत्यांनी भर देणे गरजेचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)