Pune News | 82.34 कोटीचे बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण ! निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Pune News | नगररचना विभागात कार्यरत असताना तेथे केलेल्या भ्रष्टाचारातून बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर (Suspended Town Planning Joint Director Hanumant Nazirkar) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला (bail application rejected, Pune News) आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. हेडाऊ (Additional Sessions Judge S.B.Hedaoo) यांनी हा आदेश दिला.

नाझीरकर व त्यांच्या कुटुंबीयांकडे 82 कोटी 34 लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या 37 कंपन्या असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. तर नाझीरकर यांच्या बेनामी मालमत्ता बँकेत गहाण ठेवून त्याद्वारे या गुन्ह्यातील आरोपी खोमणे यांनी 48 लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यानंतर ती रक्कम नाझीरकर कुटुंब भागीदार असलेल्या कंपनीत गुंतवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोमणे याने तयार केलेल्या बनावट करारनाम्यापैकी 35 करारनामे हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच या व्यतिरिक्त 346 कृषी पावत्या जप्त करावयाच्या आहेत. खोमणेच्या वैयक्तिक बँक खात्यावर 87 लाख रुपयाचे झालेले व्यवहार, गीतांजली ब्रिडर्स कंपनीत गुंतविलेले 23 लाख इत्यादी स्वरूपात केलेली गुंतवणूक ही त्याचे उत्पन्नापेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात आहे.

 

नाझीरकर (Suspended Town Planning Joint Director Hanumant Nazirkar )यांनी सासर्‍यांच्या नावे 35 आणि स्वतः व पत्नीच्या नावाने 17 स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सास-यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार करून सर्व मालमत्ता व कंपन्या या पत्नी संगीता नाझीरकर (Sangeeta Nazirkar) यांच्या नावाने वर्ग केल्या आहेत. न्यायालयाने येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवागनी केल्यानंतर नाझीरकर यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील राजेश कावेडिया (Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी विरोध केला. ॲड. कावेडिया (Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने नाझीरकर यांचा जामीने फेटाळला.

पोलिसांना देत होता गुंगारा :

नाझीरकर यांना 24 मार्च रोजी पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch pune rural) महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथून अटक केली. मागील अनेक दिवसापासून नाझीरकर ते पोलिसांना गुंगारा देत होता. नाझीरकर याच्यावर पुण्यातील दत्तवाडी व अलंकार पोलिस ठाण्यात (alankar police station) तर मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्यांना अलंकार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

 

तपासातून पुढे आलेल्या बाबी :

– नाझीरकर कुटुंबीयांकडे 82 कोटी 34 लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता

– कुटुंबीयांच्या नावे आणि भागीदारी असलेल्या 37 कंपन्या

– भ्रष्टाचारातून आलेल्या पैसा सास-यांच्या नावे गुंतवला

– पैशातून स्थावर मालमत्ता आणि विविध भागीदारी संस्थांमध्ये गुंतवणूक

– सार-यांच्या नावे 35 आणि स्वतः व पत्नीच्या नावाने 17 स्थावर मालमत्ता

– सास-यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले.

 

Web Title : Pune News | 82.34 crore illegal property case! Suspended Joint Director of Town Planning Hanumant Nazirkar’s bail application rejected by court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Crime | लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्याकडून 25 वर्षीय तरुणाची हत्या, माजी शहराध्यक्षासह दोघा जणांना अटक

Neeraj Chopra | नीरज चोप्रासाठी केलेल्या ट्वीटमुळे ‘बिग बीं चांगलेच चर्चेत, ‘या’मुळे होतायेत ट्रोल

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 % पर्यंत होणार कपात, जाणून घ्या