Pune News : एड्सग्रस्त मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रजासत्ताक दिनावर यंदा कोरोनाचं संकट होते. परंतु विद्यार्थ्यांना आनंद देण्यासाठी ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त विद्यार्थ्यांसोबत ‘हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्ट’ आणि शिवतीर्थ प्रतिष्ठान वतीने प्रजासत्ताक दिन’ साजरा केला. या उपक्रमाचे १६ वे वर्ष होते, अशी माहिती ‘हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्टचे गिरीश गुरनानी यांनी पत्रकाद्वारे दिली.

ममता फाउंडेशन शाळेतील उपस्थित ३० एड्सग्रस्त मुलांना झेंडे, फुगे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. झेंडे आणि फुगे यामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते. यावेळी मुलांना खाऊ देण्यात आला, असे हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्टचे गिरीश गुरनानी आणि ‘शिवतीर्थ प्रतिष्ठान’ चे अमोल गायकवाड यांनी सांगितले.

‘झेंडा, फुगे, खाऊ मिळाल्यानंतर पीडित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता. समाजाचा एड्स ग्रस्त रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही त्यामुळे त्यांची नेहमी हेटाळणी होते. अशा रुग्ण मुलांना आनंद देण्याच्या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम संस्था गेली १६ वर्ष राबवत आहे.
यावेळी मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पाळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे आदी उपस्थित होते.