Pune News : प्रियांक शाह यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार सेल पुणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉग्रेस (NCP) पार्टीच्या उद्योग व व्यापार सेल पुणे शहर (Pune City) उपाध्यक्ष पदी प्रियांक राजेश शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार सेल पुणे शहर अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांनी केली आहे.

नियुक्ती नंतर प्रियांक राजेश शाह म्हणाले की, महाराष्ट्र कट्टा आणि सेलच्या माध्यमातून व्यापारी वर्गाच्या समस्या, अडी-अडचणीचे निराकरण करण्याचा प्रयत्न मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून करणार आहे.

प्रियांक शाह यांनी यापुर्वी देखिल ही विविध माध्यमातून सामाजिक कार्य करित आले आहेत. त्यांचे हेच सामाजिक कार्य पाहता हि नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापुर्वी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे कामे मार्गी लावली होती. व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे त्यांनी निरासन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

खासदार वंदनाताई चव्हाण आणि आमदार चेतन तुपे सह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून शाह यांचे अभिनंदन ही केले.