Pune News : मनमानी भाडेवाढ आम्हाला अमान्य, आमचा धंदा सुरु करून द्या : कामगार नेते बाबा आढाव यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  जागेच्या मालकीचा प्रश्न आम्ही उपस्थित केलाच नाही. जागा मार्केट कमिटीचीच आहे, त्यामुळे रास्त व वाजवी भाडे भरण्याची आमची तयारी आहे. पण दिवसाला 400 रुपये व 18 टक्के जीएसटी मिळून अशी मिळून लादलेली मनमानी भाडेवाढ आम्हाला अमान्य आहे. आमचा धंदा सुरु करून द्या. अशी मागणी पथारी व्यवसायिक पंचायती चे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले आहे.

1 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे पथारी व्यावसायिक पंचायतीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर अन्याय्य भाडेवाढ आकारणी कमी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. आजच्या उपोषणात सर्व पथारी व्यावसायिकांचा सहभाग आहेत.