Pune News : मांजरी परिसरात घरफोडी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात बंद फ्लॅट फोडण्याचे सत्र कायम असून, मांजरी परिसरात कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील २३ हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून ९७ हजारांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी सुधाकर त्रिपाठी (वय ३०, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर कुटूंबियासह मांजरी-बुद्रुक परिसरात घुले वस्तीवर राहायला आहेत. कामानिमित्त ते घराला कुलूप लावून गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील २३ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ९७ हजारांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके करीत आहेत.