Pune News | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. निकिता मयूर गायकवाड यांच्या वतीने तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आज (बुधवार) 10 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन (Career Guidance) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील (Pune News) मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. निकीता मयुर गायकवाड (Dr. Nikita Mayur Gaikwad) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune City President Prashant Jagtap) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये मुलींना घरची जवाबदारी असताना देखील त्या नियोजन पूर्वक अभ्यास करुन मुलांपेक्षा जास्तीत जास्त टक्केवारी मिळवतात. तसेच ज्ञानदीप अकॅडमीचे संस्थापक महेश शिंदे (Gyandeep Academy Founder Mahesh Shinde) यांनी मुलांना 10 वी नंतरचे शिक्षणाचे विविध क्षेत्रातील करिअर या विषयावर मार्गदर्शन केले. (Pune News)

 

आमदार जयदेव गायकवाड (MLA Jaydev Gaikwad) यांनी विधार्थांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जास्तीत जास्त शिकून आपले करिअर घडवावे असे सांगितले. या कार्यक्रमात माजी आमदार कमलनानी ढोले पाटील (Former MLA Kamal Nani Dhole Patil) यांनीही विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.

शं.बा.ढोले पाटील माध्यमिक विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वेताळ सर आणि
सजनाबाई भंडारी विधालयाचे मुख्याध्यापक ऐडके सर यांनी आपले, मनोगत व्यक्त केले, पुंडकर सर यांनी सूत्रसंचालन केले.

 

या कार्यक्रमाला आनंद सवाणे, मिना पवार, राहुल तांबे, अदील सैय्यद, सुनिल भोईटे,गौतम सवाणे, प्रकाश साळवे,
प्रितम भोसले, देवाप्पा सोनार, दिपक ओव्हाळ, प्रविण साळवे, विजय जाधव, आसिफ शेख, नरेश रामोशी,
अनिल घटवळ, चंद्रकांत जगताप, भिमसेन जमादार, जयश्री यादव, रीना अडागळे, श्वेता पंडित, सिमा वाघमारे,
सुवर्णा माने, शालिनी भोजने, पोपट कांबळे उपस्थित होते. डामसे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मयुर जयदेवराव गायकवाड व त्यांचे मित्र परीवार यांनी परीश्रम घेतले

 

 

Web Title :- Pune News | Career guidance for youth on the occasion of Ajit Pawar’s birthday

  
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, मात्र ‘या’ चार ठिकाणी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

 

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

 

Income Tax Return | कोणत्या लोकांना असते ITR Form-1 ची आवश्यकता, कशी आहे तो ऑनलाइन भरण्याची पद्धत; येथे जाणून घ्या पूर्ण डिटेल्स