Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणेकारांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. वनाझ ते शिवाजीनगर (Vanaz to Shivajinagar) धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) रिच दोन मार्गातील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट या स्थानकांची कामे गतीने पूर्ण केले जात आहे. त्यामुळे लवकरच वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतचा मेट्रो प्रवास सुरू होणार आहे.

 

याबाबत माहिती महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (Dr. Brijesh Dixit) यांनी दिली आहे. वनाज ते सिव्हिल कोर्ट दरम्यानचे पिलर यापूर्वीच उभे राहिले असून, रेल्वे रूळ टाकण्यासाठीच्या सेगमेंट व व्हायाडक्टचे कामही पूर्ण झालेय. या मार्गिकेवर आता विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या स्थानकांसोबतच इतर कामे देखील वेगाने पूर्ण करून येत्या काही महिन्यांमध्ये वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रो धावू शकेल, असं डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Metro | vanaz to shivajinagar metro to run soon pune metro news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले’ – रावसाहेब दानवे

 

Pune Crime | पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील घटना

 

Pune ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात