Pune News | डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या स्मरणार्थ अंनिसचा ‘हास्य जागर’ हास्यास्पद – चैतन्य तागडे

पुणे (अजय सोनावणे) : Pune News | अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा (Dr Narendra Dabholkar) मृत्यू दुर्दैवी होता. परंतु त्यांचे अनुयायी सुद्धा धर्माविरोधात दांभिक प्रचार करत आहेत. सर्वात हास्यास्पद म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ ‘हास्य जागार’ सारख्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. यावरून त्यांची वैचारिक पातळी समजते, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) चैतन्य तागडे (Chaitanya Tagde) यांनी केले. (Pune News)

ते शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी सनातन प्रभातच्या २५ व्या वर्धापन दिनी पुण्यातील एरंडवणे येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

चैतन्य तागडे पुढे म्हणाले की, पुरोगामी विचारांच्या नावाखाली धर्माला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने जनजागृती केली. या कायद्याचा अभ्यास केला आणि विचाराला विचाराने प्रत्युत्तर दिले. जे धर्माच्या विरोधात काम करतात ते राष्ट्रद्रोहीसुद्धा असतात. (Pune News)

 
अशा संस्थांना मिळणारे आर्थिक पाठबळ नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. सनातन प्रभातने हे वेळोवेळी उघड केले आहे. हे समाज सुधारण्याचा आव आणतात पण यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. अशा धर्मविरोधकांशी प्रतिवाद करण्यासाठी सनातन प्रभात घरोघरी पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे तागडे म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याधर नारगोलकर, नागेश जोशी आणि चैतन्य तागडे उपस्थित होते. कार्यक्रमाला भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) आणि मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Manjushri Khardekar) हे देखील उपस्थित होते. सनातन प्रभातच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी मोठ्या संख्येने वाचक, जाहिरातदार, सनातन संस्थेचे साधक आणि सनातन प्रभातचे शुभेच्छुक यांनी गर्दी केली होती.

काय आहे ‘हास्य जागर’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या समृतिदिनानिमित्त 
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील हास्य कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
सानेगुरूजी स्मारक, सिंहगड रोड, पुणे येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमाला ‘अंनिसचा विवेक जागर’
असे नाव देण्यात आले होते. हास्य जत्रेचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आणि
विनोदी कलाकारांची टीम उपस्थितांना हसता हसवता प्रबोधन करणार असल्याचे समितीने म्हटले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट,
मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक; हत्येचे कारण आले समोर