Maharashtra Police News | सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक; हत्येचे कारण आले समोर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | सांगोला तालुक्यातील वासुद येथे रात्री जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे API Suraj Vishnu Chandanshive (वय-42 रा. वासूद ता. सांगोला) यांचा निर्घृण खून (Murder) करण्यात आला होता. चंदनशिवे यांच्या हत्येचा गुंता सुटला आहे. (Solapur Crime News) या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दालात कार्यरत असणाऱ्या सुनील मधुकर केदार (Sunil Madhukar Kedar) याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. केदार हा देखील वासुद गावचा असून आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Maharashtra Police News)

पोलिसांनी सुरज चंदनशिवे खुन प्रकरणात मुंबई पोलीस दलातील कर्मचारी सुनील केदार आणि त्याच गावातील सहकारी विजय केदार (Vijay Kedar) या दोघांना खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. हत्या झालेल्या सुरज चंदनशिवे यांना केदार यांचे काही पैसे द्यायचे होते, यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे.

3 ऑगस्ट रोजी रात्री जेवण केल्यानंतर सूरज हे आपल्या राहत्या घरापासून थोडं दूर शतपावली करण्यासाठी गेले होते. केदारवाडी रस्त्यावर (Kedarwadi Road) ते शतपावली करत होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी सूरज यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Sharp Weapon Attack) केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शतपावली करुन बराचवेळ झाला तरी सूरज घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी सूरज यांचा मृतदेह वासूद – केदारवाडी रोडजवळ आढळून आला. (Maharashtra Police News)

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याचे (Sangola Police Station)
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी (PI Anant Kulkarni) यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता.
पंधरा दिवसांच्या तपासानंतर सांगोला पोलिसांच्या हाती खूनाचे धागेदोरे लागले आहेत.
संशयित आरोपी सुनील‌ केदार याला सांगोला पोलिसांनी आठ दिवसापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतले होते.
चंदनशिवे आणि केदार यांच्यात पैशांचे मोठे व्यवहार होते.
या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांना संशय होता. तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सुनील‌ केदार व विजय केदार या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सांगोला पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड (DySP Vikrant Gaikwad) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी