Pune News | महागाई विरोधात काँग्रेसचा आंदोलनांचा धडाका; पुण्यातील सायकल यात्रेत् नेते सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेले आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) निर्माण केलेल्या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस (Congress ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवसांचे राज्यव्यापीआंदोलन करण्यात येत असून पुण्यात आज गुरुवारी सायकल यात्रा काढण्यात आली.

पुण्याच्या लष्कर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकल यात्रा नेण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील basavraj patil, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी Mohan Joshi, शहराध्यक्ष रमेश बागवे ramesh bagwe यांनी नेतृत्व केले. पक्षाचे नेते, सायकल चालवत सहभागी झाले होते.

येत्या दहा दिवसात राज्यस्तरावर सायकल यात्रा, पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढी विरोधात सह्यांची मोहीम, महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Movement), आदी मार्गाने मोदी सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे.

खाद्यतेले, इंधन, स्वयंपाकाचा गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भावात वाढ करून मोदी सरकारने अच्छे दिन ऐवजी बुरे दिन आणले असे महिला म्हणू लागल्या आहेत. भाजपला (BJP) मते दिल्याचा पश्चाताप अनेकांना झाला आहे. सामान्य माणसाचा हा आवाज मांडण्यासाठी पुढील दहा दिवस काँग्रेस् आंदोलनाचा धडाका उडवेल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

Web Titel :- Pune News | Congress launches agitation against inflation; Cycle Yatra leaders from Pune participate

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष