Pune News : कोरोनाचे नियम न पाळणार्‍या पुण्यातील 47 हॉटेल्सवर मनपाकडून दंडात्मक कारवाई; एफसी रोडवरील हॉटेल वैशाली व रूपालीसह गुडलक कॅफेचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्राधूर्भाव लक्षात घेता पुण्यात हॉटेल व इतर आस्थपणा यांच्यावर पुणे महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. नियम न पाळणाऱ्या हॉटेलवर कारवाई करत दंड आकरला आहे. यात प्रसिद्ध अश्या एफसी रोडवरील गुडलक कॅफे, वैशाली आणि रुपाली हॉटेलचा समावेश आहे. एकूण 47 हॉटेलवर गेल्या 5 दिवसात ही कारवाई केली आहे. प्रत्येकी 5 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्स, सॅनीटायझर आणि मास्क न घालणे यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाच्या मनीषा नाईक यांनी सांगितले.

 

शहरात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस प्रशासनाकडून नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण अनेक ठिकाणी याचे पालन होताना दिसत नाही. आता अश्या ठिकाणी पालिका कारवाई करत आहे. त्यानुसार गेल्या 5 दिवसात शहरातील 47 हॉटेल कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत, पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी ही माहिती दिली की, यापुढे देखील शहरात ही कारवाई सुरू राहणार आहे. हॉटेल व्यवसायिक तसेच इतर आस्थापणा यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमाचे पालन करावे. दिलेल्या सूचना पाळाव्या तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.