ATM कार्ड क्लोनिंग करून बनावट कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला सायबर गुन्हे शाखे कडून अरेस्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम कार्ड क्लोनिंग करून बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या आंतरजिल्हा टोळी नाशिक येथून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केली. त्यांच्याकडून 359 बनावट एटीएम कार्डसह मोठ्या प्रमाणात डाटा मिळाला आहे.
मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (37) , मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (37, रा.डोंगरी, मुंबई) असे अटक कण्लेल्याचे नाव आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत डेनिस मायकल (32,रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मायकल यांच्या खात्यातून 30/11/2020 रोजी नाशिक येथील एटीएम सेंटर वरून 10 ट्रानझाक्शन करून एक लाख रुपये काढण्यात आले. याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अशाप्रकारचे 200 ते 225 गुन्हे पोलिसांकडे आल्याने त्याबाबत तक्रारींचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला असता ते नाशिक येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांचे पथक नाशिकला जाऊन त्यांनी आरोपी ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून 359 बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, 13 एटीएम स्कीमर डिव्हाईस, 12 डिजिटल मायक्रो कॅमेरा, दोन वॉकिटॉकी, चार्जर, हेडफोन, 15 मायक्रो बॅटरी आणि त्याचे मॅकनिझम, 50 डाटा केबल, चार लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, 11 सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, 11 स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, चार इलेक्ट्रॉनिक सर्किट, 9सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्याकरिता लागणारा कलर प्रिंटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल डफळ यांच्या पथकाने केली आहे.

दोन वर्षे आरोपी दुबईत
मोहम्मद फैजन फारुख छत्रीवाला हा त्याचे इतर साथीदारासोबत, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो मागील तीन वर्षापासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार आहे. गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे दोन वर्षे दुबई मध्ये पळून गेला. डिसेंबर 2019 मध्ये तो भारतात परतला आणि त्याने पुन्हा सायबर गुन्हे सुरू केले. इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा पर्यंत त्याचे शिक्षण झाले असून दुसरा आरोपी अल्पशिक्षित आहे.