Pune News : कंपनीचा सर्व्हर हॅक करून सायबर चोरट्यांनी तबल दीड कोटीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीचा सर्व्हर हॅक करून सायबर चोरट्यांनी तबल दीड कोटीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान सर्व्हर हॅककरून बँकेचे करोडो रुपये लुटले होते. या घटना सतत होत असून, सायबर सिक्युरिटी मजबूत नसल्याने या घटना घडत। असल्याचे निरीक्षण पोलीस सांगत आहेत.

याप्रकरणी विश्वास साळुंखे (वय ४३, रा. वडगाव बुद्रूक) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नवले ब्रीज परिसरात विश्वास साळुंखे यांचे देवदूत डिजीटल पेमेंट अ‍ॅण्ड ई-सव्र्हिसेस कार्यालय आहे. एप्रिल ते जुलै २०२० मध्ये चोरट्यांनी संबंधित कंपनीचा सर्व्हर हॅक केला. त्यानंतर ऑनलाईन दीड कोटी रूपये वर्ग करून घेतले. त्यानंतर व्यवहाराची माहिती कंपनीच्या सर्व्हरवरून डिलीट करून टाकली. काही दिवसांनी हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक देवीदास घेवारे हे करीत आहेत.