Pune News : कोंढव्यात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात ८ ठिकाणी कोरोना विरोधातील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्याप्रमाणे कोंढव्यातही कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नगरसेवक साईनाथ बाबर आणि नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी महापालिकेकडे केली आहे.

नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी पोलिसनामा ऑनलाईनला सांगितले की कोंढवा हा मोठा परिसर असल्याने या भागातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांना दुसर्‍या भागात जाऊन लस घ्यावी लागणार आहे. कोंढव्यात २०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आणि ५०० लोकांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यामुळे कोंढव्यातील गाडगे महाराज मनपा शाळा व मौलाना आझाद उर्दू शाळा येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी वानवडी रामटेकडी क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ. बेंडे यांच्याकडे केली आहे.

कोंढवा येथील आरोग्य अधिकारी, डॉक्टर, सफाई कामगार यांना लसीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यासाठी कोंढव्यात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनपा अधिकारी आशिष भारती यांच्याकडे केली आहे.