Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण; 7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘तेर पॉलिसी सेंटर’तर्फे (Ter Policy Center) देण्यात येणाऱ्या ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यंग रिसर्च फेलोशिप 2020-21’ चा (apj abdul kalam young research fellowship) वितरण समारंभ डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनी 27 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पार पडला. 7 युवा संशोधकांना या कार्यक्रमात गौरविण्यात (Pune News) आले.

या फेलोशिपचे हे तिसरे वर्ष आहे. देशातील 7 तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात आले. कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया (Kinetic Group Chairman Arun Firodia) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशोक मंगोत्रा (Ashok Mangotra), डॉ. सतीश कुलकर्णी (Dr. Satish Kulkarni), अनील अरोरा (Anil Arora) यांनी परीक्षण केले. गुरकंवल कौर, मजिंदर कौर, कनीहा के.जी., पवन ए., ऐश्वर्या आर. हे 25 हजार रुपये रकमेच्या फेलोशिपचे मानकरी ठरले. कस्तुरी लेंडे, अजीतकुमार बिशोई हे ज्युरींतर्फे दहा हजार रुपये रकमेच्या फेलोशिपसाठी निवडले गेले .

Pune News | Distribution of Dr. APJ Abdul Kalam Young Research Fellowship in the presence of Dr. Arun Firodia; 7 Glory to young researchers

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुण संशोधकांना ही फेलोशिप देऊन गौरविण्यात येते.या योजनेचे हे तिसरे वर्ष आहे.या वर्षी 1500 अर्ज प्राप्त झाले होते.

एच.के.फिरोदिया एक्सेलन्स पारितोषिक डॉ.कलाम यांना उमेदीच्या काळात मिळाले होते याची आठवण अरुण फिरोदिया यांनी युवा संशोधकांचे अभिनंदन केले. डॉ फिरोदिया म्हणाले, ‘शेतीला वेळ दिला पाहिजे,शहरी सुविधा ग्रामीण भागाला देऊन खेड्याना आपण वेळ दिला पाहिजे या मताचे डॉ कलाम होते. ग्रामीण अर्थकारणाचे चित्र बदलतील असे संशोधन केले पाहिजे.ग्रामीण भारताची प्रगती ही खरी प्रगती ठरेल.युवा संशोधक हे नवनवीन विषयात चांगले संशोधन करीत आहेत.बाहेरील देशातील संकल्पनांवर काम करण्यापेक्षा भारतीय संकल्पनांवर संशोधन करावे,भारतीयांना उपयोगी पडणाऱ्या संशोधनावर भर दयावा.

पर्यावरण तज्ञ डॉ राजेंद्र शेंडे (Dr. Rajendra Shende) म्हणाले, ‘डॉ कलाम हे केवळ मिसाईल मॅन नव्हते,तर ‘पीपल्स प्रेसिडेंट’ होते. त्यांच्या नावाने दिला जाणारी फेलोशिप प्रेरणादायी ठरेल.युवा संशोधकांनी सकारात्मक कामाचा प्रत्यय दिला आहे.त्यांच्याकडे पाहून भारतीय युवा पिढी योग्य दिशेने पुढे जात असल्याचा आनंद होतो आहे.नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रक्रिया यानिमित्ताने पुढे येत आहेत,ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे.’

‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे (The founder of ‘Ter Policy Center’, Dr. Vinita Apte) यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या,’ डॉ कलाम यांचे
भारताविषयीचे प्रेम,भारत महासत्ता व्हावा यासाठीचा ध्यास प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार रुजावे
यासाठी फेलोशिप उपक्रम हा प्रयत्न आहे.गेल्या 4 वर्षांत 20 पेक्षा जास्त युवकाना ही फेलोशीप तेर
संस्थेमार्फत दिली आहे. 16 ऑक्टोबर पासून नविन फेलोशीप साठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु होईल’. राधा फडणीस (Radha Fadnis) यांनी सूत्रसंचालन केले.

हे देखील वाचा

Pune News | श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती आता एका आगळया वेगळ्या रुपात; अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी

Pune Crime | 29 लाखांच्या वार्षिक पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून 43 लाखांना घातला गंडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Distribution of Dr. APJ Abdul Kalam Young Research Fellowship in the presence of Dr. Arun Firodia; 7 Glory to young researchers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update