Pune News : पाणीपुरवठयात कपात करू नका – खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत केली.

डकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज पवार यांच्या अध्‍यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे झाली. त्यावेळी बापट यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये या मागणीसह कालव्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी. असे निवेदन आज पवार यांना सादर केले. बैठकीत बोलताना बापट म्हणाले की टेमघर धरणातून होणारी गळती थांबवण्यासाठी धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. तसेच सर्वत्र पाण्याचे मीटर बसवण्यात यावेत. त्याशिवाय खराडी जॅकवेलची क्षमता वाढवावी व पूर्ण क्षमतेने तो प्रकल्प चालवावा आणि शुद्धीकरण केलेले पाणी बेबी कॅनल मध्ये सोडावे. श्री पवार यांनी या प्रस्तावांचा विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले. अशी माहिती खासदार बापट यांनी आज पत्रकारांना दिली.