Pune News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त पेढे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या पुतळ्यास पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष भगवान गायकवाड व महिला शहराध्यक्ष शशिकला वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पेढे वाटप करण्यात आले.

‘मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढा सोळा वर्ष सुरू होता या सोळा वर्षांच्या वनवासा मध्ये आठवले साहेबांनी मोठा लढा उभारला होता यामध्ये बरेच कार्यकर्त्यांना जेल मध्ये जावे लागले’ असे आपल्या भाषणात संजय सोनवणे यांनी सांगितले.

नामांतर लढ्यातील शहिदांना यावेळेस श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी शहराध्यक्ष संजय सोनवण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, निलेश आल्हाट, मोहन जगताप, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, जयदेव रंधवे, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, रामभाऊ कर्वे, भगवान गायकवाड, लियाकत शेख, बाळासाहेब जगताप, सुन्नाबी शेख, चिंतामण जगताप, गणेश जगताप, शशिकांत मोरे, संदीप धांडोरे, महादेव कांबळे, संतोष खरात, अविनाश कदम, उद्धव चिलवंत, अक्षय गायकवाड, बाळासाहेब शेलार, संतोष कांबळे, रमेश तेलावडे, अतुल भालेराव, शांतिनाथ चव्हाण, सतीश अल्हाट व पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.