Pune News | डॉ. पी. ए. इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान; राष्ट्रीय पुरस्काराचे डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते शानदार वितरण

पुणे : Pune News | अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यापीठ स्थापन करुन शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे (Dr. PA INAMDAR University) कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना डॉ कुमार सप्तर्षी (Dr. Kumar Saptarshi) यांच्या हस्ते, माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्त संस्थे मार्फत करण्यात आला.सन्मानचिन्ह,मानपत्र, फुले पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. (Pune News)

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील कार्यक्रमात करण्यात आला.’प्रेस मीडिया लाईव्ह’ संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट २०२३ रोजी , दुपारी १२ वाजता,आझम कॅम्पस येथे झाला.’प्रेस मीडिया लाईव्ह’ वृत्त संस्थेचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांनी स्वागत केले. (Pune News)

यावेळी बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले,’ भारत हे सर्व समावेशक राष्ट्र आहे, त्याचे स्वरूप बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. भारताच्या सर्वसमावेशकता आणि सामंजस्याला संपविण्याचे कारस्थान यशस्वी होऊ देता कामा नये. ही निवडणूक लोकशाहीची शेवटची निवडणूक ठरू शकते, त्यामुळे फॅसिस्ट सरकार पुन्हा येवू देता कामा नये ‘.

‘डॉ .पी ए इनामदार यांनी मौलाना आझाद यांच्या विचारांवर कार्य करून पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक विश्वात अतुलनीय योगदान आहे. अल्पसंख्य समाजाला शिक्षणाची दिशा देण्याचे कार्य त्यांनी निर्धार पूर्वक केले.ते माझ्यासाठी बंधुवत आहेत. मुस्लिम मुलींना शिकविण्याचे त्यांचे काम इतिहासाला कलाटणी देणारे आहे ‘, असेही उद्गार डॉ कुमार सप्तर्षी यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,’ एक कर्तव्य म्हणुन आम्ही दांपत्याने योगदान दिले आहे.
जातीवाद, प्रांत वाद, धर्म वाद आमच्या कॅम्पस मध्ये आम्ही मानत नाहीं. आम्ही हे योगदान देवू शकलो
याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांनी लिहिलेल्या राज्य घटनेला आहे.
आपण सर्वांनी भारतीय म्हणुन कार्यरत राहिले पाहिजे ‘.

माजी आमदार मोहन जोशी म्हणाले,’ डॉ पी ए इनामदार यांनी पुण्यात सर्व समाजाला सोबत घेवून एकात्मतेचे
उदाहरण समोर ठेवले. इनामदार दांपत्याने अल्पसंख्य, बहुजन समाजाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले

माजी आमदार मोहन जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होतें. एड. अयुब शेख, आबेदा इनामदार, एस ए इनामदार,
शाहीद इनामदार, बबलू शेख, मशकुर शेख, असिफ शेख, अजित दरेकर,वाहिद बियाबानी उपस्थीत होते.

हसीना इनामदार, इकबाल अन्सारी, मोहसीन शेख, हाजी सय्यद, शबीर मुजाही द, मशकुर शेख,
मुन्ना शेख, नाझिम शेख, असिफ अयुब शेख, समीर शेख तसेच राज्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
फिरोज मुल्ला यांनी सूत्र संचालन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | अभिषेक जोशी यांना ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा युवा उद्योजक’ पुरस्कार प्रदान