Pune News : बनावट शिक्षक भरती प्रकरण : मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाटसह ‘या’ 28 जणांचे जामीन फेटाळले, जाणून घ्या आरोपींची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार तत्कालीन मुख्याध्यापक संभाजी शिरसाट आणि सरकारी अधिकारी, संस्थाचालक आणि शिक्षक असे एकुण 28 जणांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला.

तत्कालीन शिक्षण मंडळाचे शिक्षण प्रमुख रामचंद्र जाधव, तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, तत्कालीन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्‍ताक शेख, जिल्हा परिषद तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर, पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योस्त्ना शिंदे आणि गोविंदराव दाभाडे यांच्यासह 28 जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि त्यांची टीमने या प्रकरणाचा तपास करून बोगस शिक्षक भरती गैरव्यवहार आणि सरकारी तिजोरीची लूट समोर आणली. खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे कामावर नसलेल्या शिक्षकांना नियुक्‍त्या दिल्याचे भासवून आणि त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण खात्यातील अधिकारी यांच्या संगनमताने मान्यता घेत शासनाची आर्थिक नुकसान केलेप्रकरणी या शिक्षक भरती घोटाळ्यातील अधिकारी, संस्था चालक व शिक्षक यांचे विरुध्द ऑक्‍टोबर 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन दत्तोबा भुजबळ यांनी बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय दंड संहिता फसवणूक, कट रचणेसह विविध कलमासह आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम विविध कलमाने गुन्हा दाखल आहे.

जामीन फेटाळलेल्यांची नावे :
१) रामचंद्र जाधव, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे व तत्कालीन शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ,
२) मिनाक्षी राऊत, प्रशासकीय अधिकारी, पुणे मनपा व तत्कालीन प्र. शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग,
३) मुश्ताक शेख, तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.पुणे
४) दत्तात्रय शेंडकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.पुणे
५) ज्योस्त्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा –
६) संभाजी शिरसाठ, मुख्याध्यापक, तथा शिक्षक नेता
७) गोविंदराव दाभाडे, संस्थापक अध्यक्ष नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डीव सर्व संचालक मंडळ,
८) परिमल गोविंदराव दाभाडे, विद्यमान अध्यक्ष नवनगर शिक्षण मंडळ
९) अश्विनी परिमल दाभाडे, सचिव, नवनगर शिक्षण मंडळ
१०) दत्तात्रय कुंजीर, मुख्याध्यापक, सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर उरुळीकांचन, ता. हवेली, जिल्हा पुणे
११) अर्जुन ( श्री. संभाजी सिरसाठ यांचा माणूस)
१२) मारुती हरिभाऊ नरसाळे, बनावट शिक्षक, प्रेरणा प्राथमिक धनकवडी
१३) शुभांगिनी श्रीरंग फुले, बनावट शिक्षिका,प्रेरणा प्राथमिक धनकवडी
१४) जयश्री आनंद काळे, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
१५) अश्विनी अहिरराव सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
१६) मंगेश अहिरे सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
१७) प्रियांका वालकोळी सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
१८) रोहिणी अहिरे सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
१९) भारती सोनवणे सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२०) जालिंदर सातव सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२१) सीमा खेडेकर सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२२) एस. एल. वालकोळी, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२३) के. आर. महाडिक, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२४) अविनाश आखाडे, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२५) नरखडे जयपाल, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२६) अमृत नवल पाटील, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२७) योगेश पाटील, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन
२८) सचिन अशोक बिब्बे, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन