Pune News : भरदिवसा गंगाधाम रस्त्यावर थरार, किरकोळ वादातून दोघांवर पालघनने सपासप वार, एकाचा खून तर दुसरा गंभीर, आरोपी ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात किरकोळ कारणावरून एकाने रस्त्यावरच पालघनने दोघांवर सपासप वार करून एकाच जागीच खून केला. तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावरच झालेल्या या थरारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. गंगाधाम रस्त्यावर हा थरार उडाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजता घडली आहे.

सलीम मेहबूब शेख (वय 24) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर तोहफिक शेख (वय 27) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल कचरावत याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे ओळखीचे आहेत. दरम्यान आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वादातून वाद झोले होते. यावेळी अनिल याने पालघन सारख्या लोखंडी कोयत्याने दोघांवर सपासप वार केले. यात सलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर तोहफिक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच अनिल याला पकडले आहे.