Pune News | स्वामी ब्रह्मचैतन्य यांच्या सानिध्यात हनुमान चालिसा पठण, आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम

पुणे : Pune News | आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे भक्ती की लहर उपक्रमांतर्गत मंगळवारी तुळशीबाग श्री राम मंदिरात हनुमान चालिसा पठण झाले. यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. (Pune News)

स्वामी ब्रह्मचैतन्य म्हणाले की, देवाच्या दारी येताना सदैव आनंदी मनानेच आले पाहिजे. कारण देवाला माणसांना आनंदीच बघणे आवडते. जर आपण आपला देह ही इथेच सोडून जाणार असतो तर देवाकडे आपण काय मागतो हे ही महत्वाचे असते. त्यामुळे सकारात्मक विचारांनी आनंदी जीवन जगावे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थितांनी सामूहिक ध्यान केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भजनांनी वातवरण अधिक मंगलमय झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी संस्थेची माहिती दिली. तसेच संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या सुदर्शन क्रियेचे महत्व देखील विषद केले.

Web Title :-  Pune News | Hanuman Chalisa Pathan in the presence of Swami Brahma Chaitanya, Art of Living initiative