Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि सर्वधर्म समभावनेतेच्या जनजागृतीसाठी मशिदीमध्ये सर्वधर्मीयांचा सुसंवाद कार्यक्रम समर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजातील सर्व घटकांना बोलावून समाजिक दायित्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेतील मोती मशीदीत मंगळवारी (दि. 24) सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)

 

मोती मस्जिद जमात ट्रस्ट पुणे, लोकसेवा सोशल फाऊंडेशन व ऑल इंडिया पयाम – ए – इन्सानियत फोरम ही एक गैर-धर्मिक, गैर-राजकीय, एक सामाजिक संस्था आहे. जी शांतता आणि सौदार्याचा संदेश देण्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्यानुसार समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या या विषयावर मौलाना बिलाल अब्दुल हई नदवी (लखनऊ) साहब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. (Pune News)

 

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सभासद गणेश बिडकर, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, राहता येथील मौलाना याह्या साहब कासमी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, सप्तऋषी गुरुजी (नागेश्वर मंदिर सोमवार पेठ पुणे), शाहिद इनामदार चेअरमन गोल्डन जुबिली सोसायटी ,फादर पीटर डिक्रुझ डायरेक्टर स्नेह संदन इन्स्टिट्यूट , भोला सिंग अरोरा अध्यक्ष गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा पुणे,गोरक्षक गोपी महाराज,सलीम पटेकरी, बिरेंद्र कुमार थापलीयल अध्यक्ष लोकसेवा सोशल फाउंडेशन, अ‍ॅड. निखिल गडकर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, इत्यादी प्रमुख उपस्थितांनी समाजामध्ये जातीय सलोखा कसा व्यवस्थित राहील, बंधू- प्रेम भाऊ कसा टिकून राहील याबाबत आपापली मते व्यक्त केली.

कार्यक्रमास समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळे, मज्जित ट्रस्टी गैर मुस्लिम समाज इतर
सामाजिक संघटना असे 400 ते 500 जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी समर्थ पोलीस स्टेशन कडे योग्य तो पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक अझीम बाबूमिया शेख मोती मस्जिद सदरे मूतवल्ली यांनी केले होते..

 

Web Title :- Pune News | Harmony in Moti Masjid on ‘Our Responsibilities to Society’, Good initiative by Samarth Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Chinchwad Bypoll Election | चिंचवडचा पुढील आमदार कोण? लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं मोठे वक्तव्य