Pune News : पुणे मनपाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी हेमंत रासनेंची फेरनिवड तर शिक्षण समिती सदस्यपदी मंजुश्री खर्डेकर; अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार; जाणून घ्या इतर सदस्यांची नावे

पुणे – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी हेमंत रासने यांची फेरनिवड झाल्याने आगामी आर्थिक वर्षात पुन्हा तेच अध्यक्षपदी राहातील यावर भाजप ने शिक्कामोर्तब केले आहे. पुणे महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच सलग सव्वादोन वर्षे अध्यक्षपद भूषविण्याची संधी हेमंत रासने यांना मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजपने निवृत्त होणाऱ्या सहा सदस्यांच्या जागेवर हेमंत रासने, राजभाऊ लायगुडे,  अर्चना पाटील, राहुल भंडारे, मनीषा कदम, महेश वाबळे यांची निवड केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ने बंडू गायकवाड, प्रदीप गायकवाड यांना संधी दिली आहे. शिवसेनेचे एकमेव सदस्य समितीमध्ये आहेत. शिवसेनेने प्रत्येक सदस्याला एक वर्ष संधी दिली आहे. विद्यमान सदस्य बाळा ओसवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने, शिवसेनेमध्ये पेच निर्माण झाला आहे. भाजपने अखेरच्या टप्प्यात रिपाइं ला स्थायी समिती मध्ये स्थान दिले नाही.

पुणे महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यपदी भाजपने मंजुश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, लता धायरकर, अल्पना वरपे, वर्षा साठे, आबा तुपे,  सुमन पठारे, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, अविनाश बागवे, प्राची आल्हाट शिक्षण मंडळात स्वतंत्र कार्यालय व अध्यक्षांसाठी स्वतंत्र गाडी देण्यात यावी अशी उपसूचना यावेळी करण्यात आली.

अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार आहे.