Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

पुणेः- Pune News | भाषा, संस्कृती आणि इतिहास यांची संपन्नता लाभलेल्या भारताच्या गौरवशाली प्राचीनतेविषयी नवीन पिढीला ज्ञान देणे आवश्यक आहे. एच. व्ही. देसाई आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने सुरू केलेले हेरिटेज सेंटर यामध्ये मोलाची भूमिाका बजावेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योगपती आणि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे प्रेसिडेंट नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केला.(Pune News)

एच. व्ही. देसाई आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने साकारण्यात आलेल्या हेरिटेज सेंटरचे उद्घाटन नितीनभाई देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा, मोहनभाई गुजराथी, सेक्रेटरी हेमंत मणियार, सह सचिव दिलीप जगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, ऍकेडमिक को ओर्डीनेटर हेमंत भिसे आणि हेरिटेज सेंटरचे संचालक डॉ. गणेश राऊत उपस्थित होते. पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सचिव हेमंत मणियार आणि सहसचिव दिलपी जगत यांच्या संकल्पनेतून हे हेरिटेज सेंटर साकारण्यात आले आहे. यावेळी बोलताना नितीनभाई देसाई म्हणाले की, आपल्या देशाला लाभलेला सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास ही आपल्या देशाची एक मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील इंडियन नॉलेज सिस्टीममधील इतिहासाला महत्त्व देण्यात आले आहे. या हेरिटेज सेंटरच्या माध्यामातून देशाचा हा इतिहास, वेगवेगळ्या लिपी आणि संस्कृतींचा अभ्यास करता येईल.

यावेळी बोलताना राजेश शहा म्हणाले की, महाराष्ट्रातील हे पहिलेच हेरिटेज सेंटर असून एच. व्ही. देसाई आर्टस् सायन्स
अँड कॉमर्स कॉलेजने यासाठी पुढाकार घेतला, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या हेरिटेज सेंटरचे विविध उपक्रम
आणि कार्यक्रमांना लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी बोलताना प्रा. डॉ. गणेश राऊत म्हणाले की,
पुण्यामध्ये सुमारे २५० वारसा स्थळे असून त्यांच्याविषयीची
माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आणि आपल्या प्राचीन भारताची ओळख करून देणे हा या सेंटरचा उद्देश आहे.
या सेंटरच्या माध्यमातून पुण्यातील वारसा स्थळांची ऐतिहासीक माहिती अभ्यासपूर्ण पद्धतीने देणारे गाईड निर्माण
करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. व्ही. देसाई आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे
प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gangster Hemant Dabhekar Meet Srikant Shinde | गँगस्टर शरद मोहोळचा राइट हॅन्ड पोहोचला ‘वर्षा’वर, कुख्यात गँगस्टरने घेतील खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

Pune Police PSI Suspended | पुणे विद्यापीठातील ललित केंद्रामध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

पुणे : मॅट्रिमोनी साइटवरील ओळख तरुणीला पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Nagpur Crime News | पंतप्रधानांच्या बॅनरचे विद्रुपीकरण युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला अटक; काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केला निषेध, काँग्रेसकडून कुणाल राऊत यांना घरचा आहेर

पुण्यात नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, गर्भपात केल्याप्रकरणी चुलत्याला अटक