Pune News | हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून अवघ्या मिनिटांत पुण्यात आणले मानवी हृदय; शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यामध्ये काल (दि.26) एका जवानाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Heart Transplantation Surgery) पार पडली. यासाठी नागपूरहून (Nagpur) हवाई दलाच्या विमानामधून एक मानवी हृदय (Human Heart) पुण्याला (Pune News) आणण्यात आले. शहरातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) येथे जवानाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. हे मानवी हृदय व्यवस्थितपणे आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor) देखील तयार करण्यात आला होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) AN-32 विमानाने नागपूर ते पुणे हा 700 किलो मीटरचे अंतर पार केले. याद्वारे मानवी हृदय पाठवण्यात आले. हृदय नागपूरहून पुण्याला नेण्यासाठीचा उड्डाणाचा वेळ सुमारे 90 मिनिटे होता. शस्त्रक्रिया झालेला व्यक्ती हा 39 वर्षीय वायुसेनेचा जवान आहे. ग्रीन कॉरिडॉर आयएएफ वाहतूक पोलीस नागपूर आणि पुणे आणि एससी प्रोव्होस्ट युनिटकडून (SC Provost Unit) देण्यात आला होता. या ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयव प्रत्यारोपणासाठी जलद वितरण आणि अत्यावश्यक सेवा देण्यास मोलाची मदत होते. यासाठी वाहतूक विभागांतर्फे 60 ते 70 टक्क्यांपेक्षा कमी वेळेत अत्यावश्यक वस्तू पोहचती करु शकेल अशा पद्धतीची वाहतूक व्यवस्था तयार केली जाते.

वायुसेनेच्या जवानला हृदय देणारी महिला दाता ही शुभांगी (Shubhangi) 31 वर्षीय गृहिणी होती.
ही महिला नागपुरमध्ये पती आणि दीड वर्षांच्या मुलीसह राहत होती.
काही दिवसांपूर्वी शुभांगीला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर 20 जुलै रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिच्या मेंदूमध्ये ब्लड क्लॉट्स (Blood Clots In Brain) असल्याचे निदान झाले. काहीच दिवसांत ही महिला ब्रेन डेड झाल्याचे सांगण्यात आले. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे (Dinesh Mandpe) यांनी महिलेच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. तिच्या पतीच्या व भावाच्या संमंतीने चार गरजूवंतांना त्यांचे अवयव दान करण्यात आले. यामध्ये त्यांचे हृदय, यकृत व दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. यामध्ये हवाई जवानाला त्यांचे हृदय दान करण्यात आले असून, जवानाची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यामध्ये (Pune News) यशस्वीरित्या पार पडली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Nominated MLC | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीलाही संधी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “अजित पवार प्रामाणिक…”

Pune Crime News | वारजे माळवाडीमध्ये सेंट्रिंग काम करताना इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यु; कन्स्ट्रक्शन मालक व ठेकेदारावर गुन्हा दाखल

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा 14 वा हप्ता आज मिळणार; राजस्थानमधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण

Maharashtra Rain Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईसह काही भागात शाळांना सुट्टी