Pune News : भामाआसखेड प्रकल्पाचे उद्घाटन हा कार्यक्रम म्हणजे ढिसाळ नियोजनाचे उदाहरण : आमदार चेतन तुपे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भामाआसखेड प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रमा वेळी पुणे मनपा द्वारे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नव्हते. कार्यकर्त्यांना जे पास दिले होते. ते पास बघण्याची जवाबदारी मनपा सुरक्षा रक्षकांची होती. खंर तर खालच्या मजल्यावर च पास चेक करायला पाहिजे होते, तसे न करता सगळ्याच कार्यकर्तां ना सरसकट वरती सोडले जात होते. त्याचप्रमाणे लिफ्ट ही फक्त वीआयपी साठी ठेवायला हवी होती. त्याचा वापर ही सगळेच करत होते. त्यामुळे सभागृहा बाहेर गर्दी होऊन गोंधळ उडाला. यातूनच पुणे महानगरपालि के चे ढिसाळ नियोजन समोर आले आहे. असा आरोम आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केले.

भाजप च्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी बापट साहेब न येता ही घोषना बाजी सुरु केली होती. न येणार्या नेत्याची घोषणाबाजी बघून याला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादी चे कार्यकर्ते घोषणा करु लागले. परंतु दादांनी आवाज दिल्यावर सर्व कार्यकर्ते शांत झाले. असे सांगताना तुपे पुढे म्हणाले कि भाजप चे कार्यकर्ते कोणाचेच एकत नव्हते त्यांनी आपली घोषणाबाजी सुरु ठेवली. याचा त्रास सामान्य नागरिक, अधिकारी, पुलिस व पत्रकारांना ही झाला. कुठे तरी भाजप च्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवला असता तर ही वेळ आली नसती. मी व सुनील टिंगरे जाऊन महापौरांना भेटलो होतो. या कार्यक्रमा साठी ही जागा अपूरी आहे. दोन मोठे नेते येनार म्हणजे गर्दी होणारच. परंतु महापौरांनी हा कार्यक्रम इथेच घेण्यास पसंती दिली. या वर महापौर च उत्तर देऊ शकतील की नियोजन कसे चुकले आणी येनार्या काळात असे होऊ नये म्हणून योग्य ते धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. असे तुपे यावेळी म्हणाले.