Pune News | गुरुवारी पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गुरुवारी अनंत चतुर्दशी (Anant Chaturthi 2023) असल्याने पुण्यात व जिल्ह्यात गणेश मूर्तींची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. प्रत्येक वर्षी अनंत चतुर्दशीला शासकीय सुट्टी असते. मात्र, यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद (Eid e Milad 2023) एकाच दिवशी आल्याने राज्य सरकारने गुरुवारी (दि.28) ची शासकीय सुट्टी शुक्रवारी (दि.29) जाहीर केली आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao) यांनी पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. (Pune News)

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार (दि.28) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवारी (दि.29) शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (Maharashtra Govt Holiday)

गुरुवारी (दि.28) अनंत चतुर्दशी असल्याने पुणे जिह्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढण्यात
येते व नंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. प्रतिवर्षी पुणे जिल्ह्याकरीता अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर
करण्यात येते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन पुणे
जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना गुरुवारी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. (Pune News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा ! 40 दिवसांचा वेळ दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय…

Maharashtra MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, म्हणाले – ‘नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा’

Nitesh Rane On Vijay Wadettiwar | ‘विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील’ – भाजप आमदार