Nitesh Rane On Vijay Wadettiwar | ‘विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील’ – भाजप आमदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nitesh Rane On Vijay Wadettiwar | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. ते हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये आहे, असा टोला आमदार नितेश राणे यांनी पटोले आणि खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे. (Nitesh Rane On Vijay Wadettiwar)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २०२४ पर्यंत भाजपा पक्ष फुटेल असा दावा केला होता. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही असावा दावा केला होता. या दोघांचा समाचार घेताना नितेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.

नितेश राणे म्हणाले, पटोले बॉम्ब घेऊन फिरत आहेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. ते हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील, अशी चर्चा महायुती सरकारमध्ये आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांना पवार कुटुंब फार चांगले माहिती आहे.
त्यांच्या घराचे रेशन काड्या लावण्यामुळेच येते. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक काम बारामतीसह महाराष्ट्रात आहे.
असंख्य लोकांना जीवदान देण्याचे काम त्या वर्षानुवर्षे करत आहेत. सुनेत्रावहिनी उद्या खासदार झाल्या तर
महाराष्ट्राचे आणि त्यांच्या मतदारसंघाचे भले होईल. (Nitesh Rane On Vijay Wadettiwar)

ते म्हणाले, भाजपा-राष्ट्रवादीत वादाच्या कितीही पुड्या सोडल्या तरी अजित पवार-देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे हा
त्रिशुळ महाराष्ट्रातून कुणी दूर करू शकत नाही. हे तिघे फेविकॉलचा मजबूत जोड आहेत.
तिन्ही नेते एकत्र आणि एकसंघ आहेत. त्यामुळे बातम्यांमुळे वाद निर्माण होणार नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohit Kambojs Criticized Ajit Pawar | फडणवीसांचे जवळचे सहकारी कंभोज यांनी थेट अजित पवारांना डिवचले, मात्र काही वेळातच डिलीट केले ट्विट