Pune News | गुरूपौर्णिमेला भक्तिरसात न्हाऊन निघाले माणिकबाग, ‘सनातन’च्या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः अर्थात गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णु आणि भगवान शंकर आहेत. गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत, अशा गुरुंना वंदन करतो. हिंदूधर्मातील गुरू परंपरेची महती आणि परंपरा सांगणारा हा गुरूपौर्णिमेचा उत्सव, सनातन संस्थेतर्फे माणिकबाग, सिंहगडरोड येथे साजरा करण्यात आला. सिद्धार्थ हॉल येथे आयोजित या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाला शेकडो भाविकांनी तसेच धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे दिसत होते. (Pune News)

 

गुरूपौर्णिमेनिमित्त सकाळपासून गुरू पूजन आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता सनातन संस्थेच्यावतीने आयोजित जाहीर कार्यक्रमात वक्ते डॉ. निलेश लोणकर यांनी राष्ट्र आणि धर्मावरील आघात या विषयावर आपले विचार मांडले तर डॉ. ज्योती काळे यांनी गुरु-शिष्य परंपरेचे दाखले देत हिंदूधर्म रक्षणासंदर्भात आपले विचार मांडले. डॉ. निलेश लोणकर यांचे स्वागत सनातन संस्थेच्या राजेश गोणेवार यांनी तर डॉ. ज्योती काळे यांचे स्वागत नूतन शहा यांनी केले.

 

आखीव-रेखीव अशा या कार्यक्रमात महिलांनी आपले स्वसंरक्षण कसे करावे, याची प्रात्यक्षीके हिंदू जनजागृती समितीच्या हिंदू राष्ट्रवीरांनी सादर केली. यामध्ये कराटे, चाकू हल्ला प्रतिकार, दंड साखळीने स्वसंरक्षण इत्यादी प्रात्यक्षीके सादर करण्यात आली. स्नेहल पारेख आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांनी सादर केलेली प्रात्यक्षीके लक्षवेधक ठरली. (Pune News)

 

धर्म-अधर्माचा लढा अनादी काळापासून
उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. निलेश लोणकर यांनी म्हटले की, राष्ट्र म्हणजे येथील जीवंत लोक, या लोकांचे रितिरिवाज, संस्कृती आणि चालीरिती होय, म्हणूनच धर्मावरील आघात हा राष्ट्रावरील आघात आहे. धर्म-अधर्माचा लढा अनादी काळापासून सुरू आहे. यापूर्वी परकीय शक्तींनी येथील बहुसंख्यांकाच्या धर्मावर आघात केले. मंदिरे फोडणे, हिंदू राजसत्ता नष्ट करणे, नावे बदलणे असे प्रकार घडले आहेत. आताही असे आघात अधुन-मधून होत आहेत. सिकंदर या मातीतून पराभूत होऊन गेला होता, पण इतिहासात सांगितले जाते की तो जगज्जेता होता. अशाप्रकारे आपल्या इतिहासावर सुद्धा आघात करण्यात आला आहे. इतिहासावरील हा आघात धर्मावरील आघात आहे. आजही गड किल्ल्यांवर अतिक्रमण, आघात होत आहेत.

 

संविधानात्मक मार्गाने आंदोलने करा
डॉ. लोणकर पुढे म्हणाले की, सध्या दहशतवाद हा मोठा आघात आहे. घडणारी विविध दहशतवादी कृत्ये ही धर्मावरील आघातच आहेत. हा दहशतवाद इस्लामी सत्ता आणण्यासाठीच आहे. चित्रपटांमधून देखील हिंदू धर्मावर आघात केले जातात. धर्मावरील हे आघात आपले धर्मज्ञान कमी होत असल्यानेच होत आहेत. लोकांनी सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्ही धर्मावर होणार्‍या आघातांविरूद्ध संविधानात्मक मार्गाने आंदोलने करू शकता. धर्मावरील हे आघात रोखण्यासाठी तुम्ही अधुनिक माध्यमांचा वापर केला पाहिजे. आपला शत्रू घरातच आहे. संघटित होऊन हिंदूराष्ट्रासाठी सतत प्रयत्नशील राहीले पाहिजे. हिंदूराष्ट्र ही आपली संविधानिक मागणी आहे.

 

 

पर्यावरणाला देवत्व देणारा एकमेव धर्म
डॉ. लोणकर म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदूराष्ट्रासाठी मोठे काम सुरू आहे. आपण बहिष्काराच्या शस्त्राचा सुद्धा वापर केला पाहिजे. कर्नाटकमध्ये राज्य सरकार आणि जनता हिंदूराष्ट्रासाठी प्रयत्नशील आहे. सध्यस्थितीत हिंदूंचे सैनिकीकरण होण्याची गरज आहे. आपण स्वा. सावरकरांचे विचार अनुसरले तर हिंदूराष्ट्र येऊ शकते. हिंदू हा एकमेव धर्म आहे जो पर्यावरणाला सुद्धा देवत्व प्रदान करतो. यामुळेच हिंदूराष्ट्र आले तर संपूर्ण जगात शांतता प्रस्तापित होईल, असा विश्वास डॉ. लोणकर यांनी व्यक्त केला.

गुरू-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य – डॉ. काळे
डॉ. ज्योती काळे यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना म्हटले की, आज गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरू-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. ज्या-ज्यावेळी धर्माला ग्लानी आली तेव्हा-तेव्हा कृष्ण-अजूर्न, समर्थ रामदास – छत्रपती शिवाजी महाराज, अशा अनेक गुरू-शिष्यांनी आपले कार्य चोखपणे पार पाडले पाडले. सध्या संपूर्ण समाज दोन गटात विभागला आहे. अशावेळी तटस्थ राहता येणार नाही. भगवान श्रीकृष्णाने म्हटले होते, तटस्थ राहणारा सुद्धा अधर्माच्या बाजूने असतो. म्हणूनच धर्माच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. (Pune News)

 

समाजाची उन्नती, पारमार्थिक उन्नती म्हणजे धर्म
डॉ. ज्योती काळे यांनी धर्म आणि धर्मरक्षण याविषयी मांडणी करताना पुढे म्हंटले की, धर्म म्हणजे केवळ पोथी, पुराणे वाचणे नाही. ज्यात समाजाची सर्वांगीण उन्नती होते, ऐहिक पारमार्थिक उन्नती होते तो धर्म. आज समाजात धर्माचे पालन होताना दिसत नाही. काहीजण आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडतात, पती-पत्नीमध्ये बेबनाव असतो, विवाहबाह्य संबंध असे प्रकार दिसतात. कौटुंबिक स्तरावर धर्म आचरणात विसंगती दिसून येते. समाजात ठिकठिकाणी फसवणूक दिसून येते, कोर्टात पिढ्यानपिढ्या न्याय मिळत नाही, धर्माला योग्य स्थान मिळत नाही, अशी स्थित हे देखील धर्मावरील संकट आहे. राजधर्म लोप पावत चालला आहे. यासाठी लोभ नसलेला, समाधानी समाज म्हणजेच धर्मनिष्ठ समाज निर्माण झाला पाहिजे.

 

 

समाजात पाप-पुण्याची कल्पना आवश्यक
धर्म आणि समाज यावर अधिक विस्तृतपणे आपले मुद्दे मांडताना डॉ. ज्योती काळे यांनी म्हटले की, समाजात पाप-पुण्याची कल्पना असणे आवश्यक आहे. पूर्वी यामुळेच गुन्हेगारी कमी होती. गुन्हा करणे हे पाप समजले जात होते. आता गुन्हेगारी वाढली आहे. सध्या धर्माचे शिक्षण कुठेही सहज उपलब्ध होत नाही. मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. यामुळे भ्रष्टाचार होत आहे. देशात श्रीरामाच्या मंदिराला खुप उशीरा न्याय मिळाला. शेकडो धर्मस्थळे आजही परधर्माच्या अधिपत्याखाली आहेत.

धर्म आणि साधना हा एकमेव उपाय
राष्ट्रात भ्रष्टाचाराने उच्चांक गाठला आहे. आज वर्तमानपत्र उघडले तर भ्रष्टाचार, दंगल, जाळपोळ अशाच बातम्या दिसतात. राजकारणाचे सुद्धा गुन्हेगारीकरण झाले आहे. पूर्वी राजाला सुद्धा दंडित करण्याचा प्रजेला अधिकार होता. कारण त्यावेळी धर्म हा राष्ट्राचा प्राण होता. आज जी दुरावस्था झाली आहे त्यावर धर्म आणि साधना हा एकमेव उपाय आहे.

 

हिंदूत्वनिष्ठांवर हल्ले होत आहेत
धर्मावर होणार्‍या आघातांबाबत बोलताना डॉ. ज्योती काळे म्हणाल्या, देशात वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद सुरू आहेत. हलाल जिहादच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था तयार केली आहे. हिंदूत्वनिष्ठांवर हल्ले होत आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. उमेश कोल्हे, कन्हैयालाल हत्याकांड हे पूर्वनियोजित षडयंत्र होते. अनेक ठिकाणी धर्मांतरासाठी दबाव आणला जात आहे. काश्मिर फाईल्स सारख्या चित्रपटातून सत्य लोकांपर्यंत पोहचू नये म्हणून अनेक अडथळे आणले गेले, चित्रपट गृहांच्या बाहेर जाणीवपूर्वक हाऊसफुल्लचे बोर्ड लावले गेले. शिवाय, या चित्रपटानंतर हिंदूंच्या हत्या वाढल्या. आज नऊ राज्यात हिंदू अल्पसंख्यांक आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

सण-उत्सवांच्या पाठीमागे मोठे शास्त्र
डॉ. ज्योती काळे पुढे म्हणाल्या, हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे आचार-विचार, पेहराव, यातून हिंदूत्व दिसले पाहिजे.
सर्व हिंदूप्रथा सुरू केल्या पाहिजेत. पूजा-पाठ, सण-उत्सव यापाठीमागे मोठे शास्त्र आहे.
यातून आत्मबल वाढते, तेज प्राप्त होते. यासाठी सण-उत्सव शास्त्रानुसार साजरे करूया. पाश्चात्य पगडा कमी करून धर्माचरण वाढले पाहिजे.

 

जिजाऊंकडून शिवरायांना मिळाले धर्मशिक्षण
माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना डॉ. ज्योती काळे म्हणाल्या,
साधना आणि धर्माचरणातून माता जिजाऊंनी छ. शिवरायांसारखे व्यक्तिमत्व घडवले.
जिजाऊंनी शिवरायांना धर्मरक्षण, गोमाता रक्षण, प्रजारक्षण शिकवले.
यातून शिवरायांनी पाच मुस्लिम पातशहांचा निपात करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
हे साधनेचे आणि धर्माचरणाचे बळ आहे. धर्मनिष्ठ व्यक्ती धर्माची हानी सहन करत नाही.
कारण त्याचे आत्मबळ जागृत झालेले असते. अशाच व्यक्ती राष्ट्र आणि धर्मासाठी उभ्या राहू शकतात.

संकटावर मात करण्यासाठी साधना आवश्यक
आगामी काळातील संकटे आणि धर्मरक्षण याविषयी डॉ. ज्योती काळे म्हणाल्या, भारत हे स्वयंभू हिंदूराष्ट्रच आहे.
1976 मध्ये आणीबाणीच्या काळात संविधानात सेक्युलर शब्द घुसवण्यात आला. याचे परिणाम नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले.
आजच्या गुरूपौर्णिमेच्या दिवशी आपण धर्मनिष्ठ होण्याचा संकल्प करूयात. सध्या आपत्काळ सुरू झालेला आहे.
कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. ऋषी मुनींनी केलेले भाकित खरे ठरत आहे.
नैसर्गिक आपत्तीत मोठी होनी होऊ शकते.
जागतिक पातळीवर विविध देशांची आपसात सुरू असलेली भांडणे पाहता तिसर्‍या महायुद्धाचा
सुद्धा कधीही भडका उडू शकतो म्हणूनच आपल्याकडे कमी वेळ आहे.
यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी साधना आवश्यक आहे, असे डॉ. काळे यांनी शेवटी म्हटले.

 

Web Title :- Pune News | Manikbagh takes a bath in devotion on Guru Purnima, crowd of devotees attends ‘Sanatan’ program

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या – एक आमदार असणार्‍याकडे 105 आमदार असणारा…

 

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही…’

 

Soil Health Card | गावात राहून सरकारी मदतीने करा ‘हा’ बिझनेस, होईल शेतकर्‍यांची गर्दी, लाखोत होईल कमाई