Pune News : मार्केटयार्ड बंद पाडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रयत्न

पुणे : मार्केटयार्डमधील घाऊक बाजारात भाजीपाला मार्केट पहाटेपासूनच सुरु झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज सकाळी आठ वाजता मार्केटयार्डमध्ये आले. मार्केटयार्डमधील भुसार बाजार बंद आहे. भाजीपाला विभाग सुरु होता. मात्र, नेहमीपेक्षा मालाची आवक अतिशय कमी होती. भाजीपाला विभागात दररोज साधारण ९०० गाड्या येतात. आज केवळ १४७ गाड्या मार्केटयार्डमध्ये आल्या.

स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला मार्केटयार्डमध्ये येऊन आडत्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र, बंद ठेवला तर शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान होईल, अशी भूमिका तेथील व्यापार्‍यांनी घेतली. त्यामुळे आलेला माल विक्री सुरु राहिली. पोलीस काही वेळाने सर्व कार्यकर्त्यांना भाजीपाला विभागातून बाहेर घेऊन गेले.