Pune News : 4 मे रोजी घेण्यात आलेला नौकरी भरती बंदीचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, मनसेची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात असणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थितीची एकूण तीव्रता लक्षात घेऊन, दिनांक ४ मे २०२० रोजी राज्याच्या आर्थिक परिस्थितीस अनुसरून नौकर भरती न करण्याबाबतचा शासन निर्णय घेतला होता. हा निर्णय घेत असतांना राज्यातील कोविड १९ रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाद झालेली होती. त्यामुळे राज्यसरकारवर याचा प्रचंड आर्थिक ताण आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर दिनांक ४ मी २०२० रोजी महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून, अनेक शासकीय खर्ज कमी करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय घेण्यात आला.

याच निर्णयात आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषध द्रव्ये विभाग, वगळता इतर कुठल्या हि विभागाची भरती न करण्याबाबतचे आदेश देण्यात आले. हे आदेश रद्द करून तातडीने शासकीय पद भरती सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
या आदेशास आता जवळपास ६ महिने पूर्ण होत आले असून, राज्याच्या एकूण महसुलात होत असलेली घट देखील कमी होत आहे. राज्यभरात लाखो तरुण बेरोजगार आहेत, या तरुणांची मानसिक स्थिती खालवत असून अनेक तरुण आत्महत्या करीत आहेत.

महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात सरकारी अनास्थे मुळे तरुणांना आत्महत्या करायला लागणे निंदनीय आहे. खाजगी क्षेत्रात देखील अनेक कंपन्यांनी नौकर भरतीवर नीरबंध लढले आहेत, अशा परिस्थिती अगेली अनेक वर्ष सरकारी नौकरी साठी अभ्यास करणाऱ्या आणि कष्ट घेणाऱ्या अनेक तरुणांचे भवितव्यचं धोक्यात आहे. याबबत राज्यसरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. माझे कुटुंब माझी जबाबदारी असे खुद्द मुख्यमंत्री म्हणतात, पण कृती मात्र विरोधाभासी आहे. कारण स्वताच्या कुटुंबातील एखद्या तरुणाने आत्महत्या करणे हे एक कुटुंब प्रमुख म्हणून नक्कीच खेदजनक आणि दुखद वाटायला हवे. मा. मुख्यमंत्री महोदयांना मात्र ते वाटत नसल्याचे दिसते कारण राज्यातील अनेक तरुणांनी गेल्या एका महिन्यात बेरोजगारीस कंटाळून आत्महत्या केली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने नौकरभरती बंदीचे आदेश रद्द करण्यात यावे, असे मत यादव यांनी व्यक्त केले.

शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात आला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थी हीतासाठी तीव्र आंदोलन करेल. राज्यभरातील सर्व तरुणाना एकत्र घेऊन हे आंदोलण केले जाईल, या आंदोलनाची दाहकता शासनास सहन होणार नाही असे देखील यादव यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.