Pune News : मार्केटयार्ड परिसरातील सोसायटीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ‘हंडा मोर्चा’चा ‘राष्ट्रवादी’चा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  गेल्या अनेक दिवसांपासून मार्केटयार्ड परिसरातील सोसायटीचा काही भाग, आंबेडकरनगर, प्रेमनगर वसाहत इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी त्यासंदर्भात वारंवार येत आहेत. याबाबत संबंधित विभाग व अधिकाऱ्यांशी अनेकदा तक्रार करून देखील उपाययोजना होत नाही. त्याकरिता आज पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आपल्या कार्यालयावर “हंडा मोर्चा” आंदोलन करण्यात येईल असे निवेदन स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता यांना राष्ट्रवादी पार्टी पुणे शहर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर चे संतोष नांगरे, संजय दामोदरे, अर्जुन दसाडे, कलिम शेख, नितीन चौधरी व इतर नागरिक उपस्थित होते.

कार्यालयीन भेटीत सतिश जाधव उपअभियंता, अंजुषा रेड्डी जुनि. इंंजिनियर स्वारगेट पाणीपुरवठा विभाग इत्यादी बरोबर चर्चा करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष भेट देउन पाहणी करण्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले. अशी माहिती नांगरे यांनी दिली.