Pune News : पुुणे शहर पोलिस व भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षासाठी दिनदर्शिका

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुुणे शहर पोलिस व भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षासाठी दिनदर्शिका काढण्यात आली आहे. वेगवेगळे संदेश असणारी ही वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज पोलीस आयुक्तालयात झाले. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक उपस्थित होते.

भारतीय कला प्रसारिणी सभा व अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतुन ही दिनदर्शिका तयार झाली. पुणेरी पाट्यांप्रमाणे दिनदर्शिकेत वेगळी शैली व तितक्‍याच चांगल्या दर्जाच्या व्यंगचित्रांचा वापर केला आहे, असे  यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले. पाठक यांनी दिनदर्शिका तयार करण्यामागील संकल्पना मांडत विद्यार्थ्यांनी तत्परतेने केलेल्या कामाचे कौतुक केले. सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.

 

हे आहेत संदेश…

“ग्रह त्यांच्यात अंतर ठेवतात, मग आपणही “सोशल डिस्टंन्सींग’ का पाळू नये’, “मी गाडी चालविताना घाबरत नाही, कारण मी वाहतुकीचे नियम मोडत नाही’ नियमांचे सत्य कायम टोचते, कारण त्यात पॉइंट असतो’, असा संदेश देणारी, नागरिकांमध्ये जनजागृती करणारी खास दिनदर्शिका अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून साकारली आहे