दिलदार ! चक्क 12 वेळा प्लाझ्मा दान करणारा ‘पुणेकर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या मोठ्या संकटात प्लाझ्मा दान करणारे कोण मिळत नाही. असे धाडशी व्यक्ती मिळणं कठीण असतं. अशा परिस्थितीत एक धाडशी व्यक्ती कोथरूड येथील अजय मुनोत हे आहेत. मुनोत यांनी आजपर्यंत चक्क अकरावेळा प्लाझ्मा दान केला आहे. तसेच ते उद्या १२ वा प्लाझ्मा दान करणार असल्याचे सांगितले आहे. तर उद्या जागतिक आरोग्य दिन आहे या दिवसाला ते बारावा प्लाझ्मा दान करणार आहे.

अजय मुनोत हे विपणन सल्लागार आहेत. पहिल्यांदा २६ ऑगस्ट मध्ये प्लाझ्मा दान केले. त्यानंतर ९ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, ३१ डिसेंबर असे सतत प्लाझ्मा दान देण्याचे कार्य मुनोत यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी केलेले प्लाझ्मा दान महिला शक्तीला समर्पित असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शहीद दिनाच्या दिवशी अजय मुनोत यांनी अकराव्यांदा प्लाझ्मा दान केले आहे.

दरम्यान, कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये कोरोना या विषाणूविरोधी प्रोटिन तयार होते. हे प्रोटिन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामार्फत, जर एखाद्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णास दिला तर हे प्रोटिन कोरोना विषाणूला मारायला मदत करते व रुग्ण लवकर बरा होतो असे तज्ञांचे मत असल्यामुळे प्लाझ्माला मोठी मागणी आहे.