Pune News : चोरी प्रकरणी एकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घराचा दरवाजा उचकटून बेडरुममधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख 17 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकास अटक केली आहे. शशिकांत अनंत माने (वय 24, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

न्यायालयाने त्याला 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सुनीता यशवंत पवार (वय 55, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांच्या घरात 11 डिसेंबर 2020 रोजी चोरी झाली होती.

माने याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा मोबाईल आणि एक लाख 20 हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी माने याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली होती.