Pune News : खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा 24 आणि 26 जानेवारी रोजी 12 वी खुली बुद्धीबळ स्पर्धा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा दिनांक २४ आणि २६ जानेवारी रोजी होणार आहे. भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टॉवर येथे ही दोन दिवसीय स्पर्धा होणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे आयोजक सुनील पांडे यांनी दिली.

दिनांक २४ जानेवारी रोजी १२ ते १८ वर्षे वयोगटात तर २६ जानेवारी रोजी १९ ते ५५ वर्षे वयोगटात (खुली) ही स्पर्धा होत आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्वीस लिग पद्धतीने सात फेºयात ही स्पर्धा होईल. दोन्ही गटातील विजेत्या व उपविजेत्यांना रोख बक्षिसे व करंडक तसेच तीन ते सहा क्रमांकाना रोख बक्षिस आणि विविध वयोगटात रोख बक्षिसे व पदकेही दिली जाणार आहेत. एकुण २० हजार रूपयांची रोख पारितोषिके आणि करंडक व पदकेही दिली जाणार आहेत. प्रत्येक गटात पहिल्या ७० स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून नियमांचे पालन करण्यासोबतच खेळाडू, पालक यांच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात येणार आहे. खेळाडूंनी आपल्या प्रवेशिका प्रशिक्षकामार्फत पाठवाव्यात अशी माहिती विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड व स्पर्धा समितीचे प्रमुख गुणेश साने यांनी दिली.