
Pune News | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने ‘श्रावण महोत्सवा’चे आयोजन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व कोथरुडचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आयोजित केलेल्या ‘श्रावण महोत्सवा’स शनिवार (दि.9) पासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील बाणेर, पाषाण आणि बालेवाडी येथे ‘श्रावण महोत्सवा’चे आज आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंगळागौर व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. (Pune News)
यावेळी संयोजन समितीच्या माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर (Manjushri Khardekar), उद्योजिका व भाजप उद्योग आघाडीच्या अमृता देवगावकर, प्रभाग 9 च्या अध्यक्ष व संयोजक उमा गाडगीळ, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नांली सायकर, अस्मिता करंदीकर, कविता साठे, विजया चांदोरकर, स्मरणीका जुवेकर, शिल्पा यादव, वैदेही बापट, मानसी खाडिलकर, मीना पारगावकर, रेखा कश्यप व महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (Pune News)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update