Pune News | पुण्याच्या सदाशिव पेठेतील उमेद फार्माचे मालक आणि बोगस गोळ्यांची डीलरशिप घेणाऱ्यास अटक, मेडिकल मार्केटमध्ये खळबळ

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) – बोगस औषध कंपनीव्दारे (Bogus drug company) गोळ्या विक्री करण्यासाठी मुंबई आणि पुण्यात डीलर नेमून त्या गोळयांची सर्व सामान्य नागरिकांना विक्री करण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गोळ्या ‘पेनकिलर’सह वेगवेगळ्या 16 आजरावर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील pune police सदाशिव पेठेतील sadashiv peth उमेद फार्माचे Umed Pharma Sales मालक व या गोळ्यांची डीलरशिप घेणाऱ्यास अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

प्रभाकर नामदेव पाटील (रा. कल्याणीनगर) prabhakar namdev patil असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सुदीप सुरेशकुमार मुखर्जी (वय 32, रा. मुंबई, मूळ. उत्तरप्रदेश) Sudip Sureshkumar Mukherjee याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात (vishrambag police station) विवेक खेडकर (वय 40) food and drug inspector Vivek Khedkar यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एफडीएचे औषध निरीक्षक (food and drug inspector)आहेत.
तर प्रभाकर पाटील यांची सदाशिव पेठेत मे. उमेद फार्मा सेल्स (Umed Pharma Sales) म्हणून औषधालय दुकान आहे.
तर सुदीप मुखर्जी याने बोगस मॅक्सरिलीफ हेल्थकेअर व्हिलेज अंजी सोलन हिमाचल प्रदेश अशी औषधे तयार केली. तर बनाबत औषध उत्पादन व विक्री परवाना तयार केला आणि त्याद्वारे डीलर नेमले.
मुंबई व पुण्यात हे डीलर नेमले होते. पुण्यात मे. उमेद फार्मा सेल्स (Umed Pharma Sales pune) याना याची डीलरशिप दिली होती.
त्याद्वारे त्यांनी या गोळ्या बेकायदेशीररित्या विक्री केल्या आहेत. पाटील यांनी या गोळ्या मेडिकल व इतरांना विक्री करण्यास दिल्या होत्या.

दरम्यान, मुंबई अन्न व औषध प्रशासनाने सुदीप मुखर्जी याला अटक केली आहे.
त्याच्यावर बनावट औषध उत्पादन व विक्री प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
त्याने बनावट कंपनी तयार केला व गोळ्यांची विक्री केली असल्याचे समोर आले.
त्यानंतर तपासात पुण्यातही विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर त्याची माहिती पुणे एफडीएला देण्यात आली.

त्यानंतर तपासात मे. उमेद फार्मा सेल्सकडून याच्याकडे या औषधांची डीलरशिप असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत प्रभाकर पाटील याला अटक केली आहे.
मे. उमेद फार्मा सेल्सचे पाटील भागादीर आहेत. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Web Title : Pune News | Owner of Umed Pharma prabhakar namdev patil and dealer of bogus pills are arrested in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri News । पिंपरीत आणखी एका तरुणाला अटक; 4 हजारांचा 176 ग्रॅम गांजा जप्त