Pune News : पुणे महानगर परिवहन कर्मचार्‍यांना सुधारीत वेतन करार लागु करावा, संचालक शंकर पवार यांची मागणी

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कर्मचान्यांना एप्रिल २०१७ ते मार्च २०२७ या कालावधीमधील सुधारीत वेतन करार लागु करावा. अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळ चे संचालक शंकर पवार यांनी केली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना पवार म्हणाले कि, परिवहन महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्यापासून आम्ही प्रवाशी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने, परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना आखल्या तसेच परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आज दिनांक २३/१२/२०२० रोजी आमच्या संचालक पदाच्या कारकीर्दीस एक वर्षाचा कालावधी पुर्ण होण्याच्या प्रित्यर्थ पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह व ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एप्रिल २०१७ ते मार्च २०२७ या कालावधीमधील सुधारीत वेतन करार (७ व्या वेतन आयोगाच्या धर्तीवरील करार) पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिके प्रमाणे लागु करण्या बाबतचे पत्र आम्ही स्वतः डॉ. राजेंद्र जगताप, आयडीईएस, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहे. त्या द्वारे हे वेतन लवकरात लवकर लागु करण्यात यावे अशी मागणी केली आहे.