Pune News : 15 वर्षीय मुलीला पळवून नेल्यानंतर केले अश्लील चाळे, तरूणाला पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिला तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केल्यानंतर मुलीने विरोध केला. पण त्यावेळी आरोपीला तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबवेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी बशीर मकदूम (वय 27) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीला ओळखतो. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुलीला त्याने फूस लावत आपण मेडिकल शॉपमध्ये जाऊन येऊ असे, सांगून दुचाकीवर बसवले. त्यानंतर तो मुलीला कोंढवा येथील टिळेकरनगर भागात असलेल्या एका टेकडीवर घेऊन गेला. त्यानंतर येथील निर्जंनस्थळी गेल्यानंतर त्याने मुलीशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने याला विरोध केला. त्यावेळी आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करत तेथे पडलेल्या लाकडी बांबूने मारहाण केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. पीडित मुलगी घरी आली यानंतर तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.