Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

शिक्रापुर : शिरुर तालुक्यात बेकायदेशीररीत्या क्षेत्राचा मेळ घालून ७/१२ सदरी अंमल क्षेत्रांत दुरुस्ती करुन अतिक्रमणाचा ताबा देण्यासाठी खोटा, बनावट आदेश तयार करुन खातेदाराशी संगनमत करुन आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे कारवाई चौकशीत आढळून आल्यानंतर अखेर शिरुर येथील महसूल नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव (Deputy Tehsildar Dnyandev Yadav) यांचे निलंबन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यादव (Deputy Tehsildar Dnyandev Yadav) यांना नुकतीच पदोन्नती मिळून ते तहसीलदार झाले होते. परंतु हा चार्ज घेण्यापूर्वीच त्यांचे निलंबनाची (suspension) ऑर्डर झाल्यामुळे त्यांना या पदाचा लाभ घेता आलेला नाही.

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pune News | Policenama impact ! Finally, action was taken against Shirur Deputy Tehsildar Dnyandev Yadav

नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांनी मौजे मांडवगण फराटा येथील जमीन गट नं. २५६/१ व २५६/२ अनुषंगाने हद्दीबाबत मोजणीमध्ये आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन त्याची अंमलबजावणी पोलीसांमार्फत करणेकरीता खोटा, बनावट आदेश तयार करुन मोजणी खातेदारांशी संगनमत करुन अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित होती. त्यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करणे, बनावट खोटे आदेश पारीत करणे, नियमबाह्य पद्धतीने कृती करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, कागदपत्रांच्या प्रती गायब करणे इत्यादी अनियमितता केल्याचे निदर्शनात आले. या अनुषंगाने त्यांची निलंबनांतर विभागीय चौकशी सुद्धा होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) मधील प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून यादव यांना ६/७/२०२१ पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी सचिन गोरख जाधव (मुंबईकर) व इतर यांनी
केलेला योग्य पाठपुरावा करुन गोळा केलेली कागदपत्रे आणि केलेल्या उपोषणामुळे
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलून अत्यंत कमी वेळेत याचा निकाल लावल्यामुळे
शेतकऱ्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी
सचिन गोरख जाधव (मुंबईकर) यांनी केलेला योग्य पाठपुरावा आणि प्रकाशीत झालेल्या बातम्यामुळे
हे प्रकरण दडपण्याची कोणालाही संधी मिळाली नाही. तसेच या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात
आर्थिक तडजोड झाल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. शिरुर तालुक्यात प्रथमच नायब
तहसीलदार पदावरील व्यक्तीला निलंबित केल्यामुळे सध्या इतर कामचुकार अधिकाऱ्यांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत.

याबाबत शिरूरच्या तहसीलदारांशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Policenama impact ! Finally, action was taken against Shirur Deputy Tehsildar Dnyandev Yadav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update