Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली ! RDC पदी हिम्मत खराडे तर हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे (resident deputy collector dr jayshree katare) यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी RDC म्हणून हिम्मत खराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पुणे जिल्ह्यातील (Pune News) हवेलीच्या प्रांतअधिकारीपदी संजय आसवले यांची नियुक्ती लागली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने निर्गमित केले आहेत.

पुण्याच्या RDC डॉ. जयश्री कटारे यांची बदली मुद्रांक जिल्हाधिकारी (अंधेरी) या ठिकाणी करण्यात आली आहे. पुण्यात मुद्रांक उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हिम्मत खराडे (Himmat Kharade, deputy inspector general, registration and stamp duty department) यांची पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्यात भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संजय आसवले (sanjay aswale) यांची हवेलीचे (Haveli) प्रांत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राज्य शासनाने अध्यादेश काढून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. डॉ. जयश्री कटारे यांच्या कार्यकाळात जिल्हा प्रशासनाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पीएम किसान योजनेचे कर्जवाटप (PM-Kisan), पूर परिस्थिती, पदवीधर निवडणूका, 750 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महिला अधिकारी म्हणून डॉ. कटारे यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉस्पिटलमधून डोळे तपासणी मशीन चोरी करणारी ‘दुकली’ गजाआड

PM Modi’s Birthday | पीएम मोदींचा वाढदिवस ! रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे स्टेशनवर मुलांना वाटले चॉकलेट, प्लेटफार्मवर चालवली सफाई मशीन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Pune resident Deputy Collector Dr. Jayashree Katare transfered to mumbai ! Himmat Kharade appointment as RDC and Sanjay Aswale as Haveli’s provincial officer in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update