Pune News | ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल’ ! कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

पुणे : Pune News | कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने ई कॉमर्स क्षेत्रातील मनमानी करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बुधवारी खराडी येथे हल्ला बोल आंदोलन करण्यात (Pune News) आले. हे आंदोलन येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती कैट महाराष्ट्रचे संयुक्त सचिव व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे (Sachin Nivangune, President, Pune District Retail Traders Association) यांनी दिली.

ई-कॉमर्स क्षेत्रातील अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण देशभरातील व्यापारी हल्ला बोल आंदोलनात सहभागी झाले आहेत. कैट संघटनेचे अध्यक्ष बी सी भारतीय, सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हल्ला बोल आंदोलन सुरु आहे. पुण्यातील खराडी येथे झालेल्या आंदोलनाला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे पुणे शहराध्यक्ष विजय नरेला, महिला शहर उपाध्यक्ष आरती नरेला, संघटक अविनाश तांबे, संपर्क प्रमुख तानाजी डफळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे देशातील व्यापारी क्षेत्रातील वातावरण गढूळ होत आहे. देशातील सर्व व्यापाऱ्यांना कायद्याची चौकट आहे. मात्र, या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना मोकाट का सोडले आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत. अशी भूमिका कैट ने घेतली असल्याची माहिती सचिन निवंगुणे यांनी दिली.

ई-कॉमर्समधील विदेशी कंपन्यांना आळा घातला नाही तर, देशातील रिटेल व्यवसायातील व्यावसायिक देशोधडीला लागतील आणि बेरोजगारी वाढेल.
आधीच कोरोनामुळे व्यापारी हैराण झाले आहेत.
त्यात या ई-कॉमर्समधील कंपन्यांचा मनमानी कारभार सुरु आहे.
सरकारने कायद्याने या कंपन्यांवर अंकुश आणावा, अशी व्यापाऱ्यांची एकमुखी मागणी असल्याचे सचिन निवंगुणे म्हणाले.

हे देखील वाचा

Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा सुसाईडचा प्रयत्न

Anil Parab | राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर नको; उच्च न्यायालय अनिल परब यांचे म्हणणे ऐकणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Pune traders ‘attack’ against e-commerce companies! CAT Maharashtra and Pune District Retail Traders Association

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update