Pune News : शाळांमध्ये सॅनिटायझर, स्टॅन्डचे व पुस्तक संच भेट, नगरसेविका ॲड. गायत्री खडके यांचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  युवकांच्या मनात प्रेरणा निर्माण करणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा समस्त भारतात युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचीही जयंती या दिनाचे औचित्य साधून नगरसेविका ॲड. गायत्री खडके यांनी प्रतिमा पूजन व प्रभागातील शाळांमध्ये सॅनिटायझर व सॅनिटायझर स्टॅन्डचे व स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकाचा संच ही भेट म्हणून देण्यात आला. कोरोनाच्या महामारी मध्ये अनेक महिने शाळा-कॉलेज बंद होते. गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थीही सर्व नियम पाळून शाळेमध्ये येत आहेत.

कोरोनाचा प्रकोप मंदावला असला तरी ही अद्याप तो नाहीसा झालेला नाही. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपल्या स्वतःची काळजी घेता यावी या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंदांची जयंती आणि युवा दिनाचे औचित्य साधून हाती घेतला.
यावेळी उल्लेखनीय सामाजिक काम यासाठी महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंगजी कोश्यारी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आलेले पीयूषजी शहा यांचा ही सत्कार करण्यात आला.

यावेळी नवीन मराठी शाळा, रानडे बालक मंदिर, कन्याशाळा, महाराष्ट्र मंडळ, हुजूरपागा, भावे शाळा, शिवाजी मराठा जिजामाता शाळा, रेणुका स्वरुप शाळां मधील शिक्षक प्रतिनिधि, विद्यार्थी प्रतिनिधी माजी नगरसेवक व स्वातंत्र्य सैनिक वसंत प्रसादे, कार्यालयीन मंत्री संजय मामा देशमुख, कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, रत्नदीप खडके, रागिणी खडके, किरण जगदाळे, योगिता गोगावले, ओंकार डिंबळे, तसेच प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.