Pune News : सरपंच पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी धमकावले; सराईताच्या कोठडीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  गुंडांना जमवून टोळी स्थापन करीत सरपंचपदी बिनविरोध निवडून येत इच्छुकांना सरपंच पदाच्या  स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी धमकवल्या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अटक केलेल्या सराईताच्या पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

तुषार ऊर्फ अप्पा सुभाष गोगावले (वय 28 रा. वडगाव बुद्रूक) या सराईताचे नाव आहे. या प्रकरणात विजय नथू पोळेकर (वय 22), विशाल नारायण कोतवाल (वय 28), ऋषीकेश रमेश पाटील (वय 27) आणि चेतन संजय कांबळे (वय 20) या देखील अटक करण्यात आली अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी रामा मरगळे, अक्षय सुर्वे, नाना कुदळे, अभिजित सुर्वे, अक्षय दहिभाते, केदार भालशंकर, मयूर वाघमारे, सुरेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्याचे किरण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता 18) हवेली तालुक्‍यातील मांडवी खुर्द परिसरात ही घटना घडली. फिर्यादी यांना मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे 70 लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता गोगावले याने मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मदतीने टोळी तयार केली. या टोळीच्या मदतीने मांडवी बुद्रूक व गोगावले वाडी या गावात दहशत निर्माण करून बिनविरोध निवडून आला. त्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर निवडून आलेल्या पॅनलप्रमुखाला सरपंच पदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी शस्त्राच्या धाकाने धमकावले. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पाच जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी, ही शस्त्र त्यांनी कोठून आणली, रामा मरगळे याने ही शस्त्र पुरवली आहेत. त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी गोगावले याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.