Pune News | बहिणीने वाचवला भावाचा जीव ! स्वत:चे यकृत देत भावाला दिले जीवदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | बहिणीने आपल्या भावाला स्वत:चे यकृत (Liver) देत जीवदान दिले आहे. सातारा जिल्ह्याच्या (Satara) खंडाळा तालुक्यातील भादे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बहिणीने पोलीस असलेल्या भावाला स्वत:चे यकृत दिले आहे. मालन बापूसाहेब चव्हाण (Malan Bapusaheb Chavan) (रा. भादे ता. खंडाळा, जि. सातारा) असं त्या धाडसी बहिणीचे नाव आहे. तर, रुपेश आप्पासाहेब नावडकर (Rupesh Appasaheb Nawadkar) (रा. वाघळवाडी, ता. बारामती. जि. पुणे) असं भावाचे नाव आहे. (Pune News)

 

वाघळवाडी येथील आप्पासाहेब नावडकर (Appasaheb Nawadkar) यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी मालन चव्हाण हिने तिचा भाऊ रुपेश नावडकर याला यकृत दान करून त्यांचा जीव वाचवला आहे. दरम्यान, रुपेश हे पोलीस कर्मचारी (Police Personnel) आहेत. त्यांचे यकृत खराब झाले होते. त्यांना तातडीने यकृताची आवश्यकता होती. पण कुठेच यकृत मिळाले नाही. तेव्हा त्यांच्या धाडसी बहिणीने स्वत: चे यकृत देऊन भावाचा जीव वाचवला आहे. (Pune News)

 

दरम्यान, मालन चव्हाण या भादे या गावी ग्रामपंचायत सदस्या (Gram Panchayat Member) आहेत. 2 फेब्रुवारी रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधे (Sahyadri Hospital Pune) त्यांचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले आहे. आपल्या भावाला यकृत देत इतर सर्व बहिणींसमोर या धाडसी महिलेने एक आदर्श उभा ठेवला आहे.

 

Web Title :- Pune News | Satara sister came running for baramati brother liver transplant pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा