Pune News : वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोविड काळापासून सतत रस्त्यावर उतरून काम करत असलेले वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांना आज भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने ‘कोविड योद्धा ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते आहेर यांना सन्मानित केले गेले. या वेळी कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,सरचिटणीस छगन बुलाखे महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे ,उपाध्यक्ष निलेश कदम,उमेश अण्णा चव्हाण ,प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर ,युवा मोर्चा पुणे शहर चिटणीस कुणाल गरुड ,करण देसाई ,तुषार रायकर ,प्रभाग अध्यक्ष किरण जगदाळे अमित शेट्टी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार टिळक म्हणाल्या ‘पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता शहरात घडणाऱ्या प्रत्येक हालचाली आपल्या पर्यंत पोहोचवत होते त्यामुळे हॉस्पिटल्स मध्ये बेडस च्या संख्या ऑक्सिजन बेडस ची स्थिती रुग्ण संख्या माहिती इत्यादी तसेच मदत कार्यात ही मोलाचा वाटा उचलत होते त्यामुळे ते देखील करोना योध्येच आहेत म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे’ या वेळी आहेर यांनी आपल्या मनोगतात आपले अनुभव कोविड काळात आलेल्या अडचणी सांगितल्या.