Pune News | येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त येरवडा येथे आज शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘शिवगर्जना’ या आशिया खंडातील भव्य-दिव्य महानाट्य साकारले जाणार आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी ही माहिती दिली.

येरवडा जेल रोड येथील के.के. भवन समोरील मैदानावर दि. 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत साय. साडेसहा ते रात्री साडेनऊ यावेळेत हे महानाट्य होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार वडगाव शेरी मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे. हे महानाटय विनामुल्य असून शिवप्रेमींनी या महानाट्याला उपस्थित रहावे.

शिवगर्जना महानाट्याचे वैशिष्टे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपुर्ण जीवपट उलगडणारे हे जिवंत महानाट्य आहे. त्यामध्ये 300 कलाकारांचा भव्य संच असणार असून फिरता 65 फुटी रंगमंचावर हे नाटय सादर होणार आहे. त्यात हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्षात वापर होणार असून चित्तथरारक लढाया, रोमांचकारी प्रसंगातून धगधगत्याची इतिहासाची आठवण करून दिली जाणार आहे. याशिवाय नेत्रदिपक अतिशबाजी पाहता येणार आहे.

महानाट्यात साकारणार हे प्रसंग

  • शिवजन्म
  • युध्द कला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण
  • स्वराज्याची शपथ, अफजलखान वध
  • पन्हाळगढ वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा
  • शाहिस्तेखानाची फजिती
  • सुरत लुट व कोकण मोहिम
  • पुरंदरचा वेढा व मुरारबाजीचे शौर्य
  • आग्रा भेट व तानाजी मालुसरे बलिदान
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’