Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीमध्ये माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी करुन गोदाम मालकाकडे प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपये खंडणी मागणाऱ्या संतोष उर्फ आण्णा देवकर व त्याच्या इतर पाच साथीदारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पुणे पोलिसांची सन 2024 मधील ही 13 वी मोक्का कारवाई आहे.(Pune Police MCOCA Action)

अण्णा उर्फ संतोष किसन देवकर (वय – 34, रा. अक्वा मॅजेस्टिक सोसायटी, फुरसुंगी), शेखर अनिल मोडक (वय 29, रा. वडकी गावठाण), साहस विश्वास पोळ (वय 25, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, वडकी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच आणखी तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी 387, 143, 147, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळी प्रमुख संतोष उर्फ आण्णा देवकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन हिंसाचाराचा वापर करुन, हिंसाचार करण्याची धमकी देऊन, धाकदपटशा दाखवुन, जुलूम जबरदस्तीने बेकायदेशीर कृत्य करत होता. याटोळीने मागील दहा वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे असे गुन्हे केले आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार,
पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, तपास पथकाचे तेज भोसले, संदीप धनवटे, प्रशांत नरासाळे, मल्हारी ढमढेरे,
रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दारु पिण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला पिंपरी पोलिसांकडून अटक, दोन फरार

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा